आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समिती:रोहित्र जळाले, नागरिकांची पाण्यासाठी वणवण

वडकी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगाव पंचायत समितीमध्ये आर्थीक उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात मोठी ग्राम पंचायत असून नियोजन शून्य कारभारामुळे वडकी ग्रामवासीयांना पाण्याविना राहावे लागत आहे. वडकी गाव राष्ट्रीय महामार्गावर असून या गावात दगड उचलेल तिथे लीडर अशी स्थिती असतानाही येथे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात समस्या दिसत आहे. अशीच एक समस्या भर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ग्रामस्थांना घोटभर पाणी देता काहो अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

प्रभाग क्रमांक चारमध्ये जिथून पाणी पुरवठा करतात, त्या ठिकाणचे रोहित्र जळाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा बंद आहे. यामुळे पाण्याविना अर्धे गाव असून ही बाब एकच दिवसातली नसून गेल्या आठ पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पावसाळ्यात घोटभर पाणी देता काहो म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. नियोजन शून्य गलथान कारभारामुळे की काय एवढ्या दिवसापासून पाणी पुरवठा बंद असताना ग्राम पंचायतने विद्युत वितरण कंपनी ला या संबंधी साधे पत्रही देण्याचे धाडस दाखविले नाही ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून ग्रामपंचायतचा सर्व कारभार हिंगणघाटवरून पाहत असल्याने ग्राम पंचायत रामभरोसे असते. त्यामुळे की काय गावातील पाणी पुरवठा सुरळीत आहे की नाही हे कुणालाच माहीत नसाव. पोळ्याच्या दिवशी प्रभाग क्रमांक चारच्या महिला पाण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आल्या असता, तेथील पाणीपुरवठा बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रोहित्र कसे चालू होईल हे न पाहता टँकरच्या शोधात लागले. यामध्ये सर्व आलबेल असल्यामुळेच मुळ उद्देश बाजूला ठेऊन सर्व काही स्वहितासाठीच चालू असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामसेवकांचे दुर्लक्ष : मी विरोधी गटाचा सदस्य असून पाणी पुरवठा बंद आहे ही बाब ग्रामसेवक यांना वारंवार सांगत होतो. पण त्यांनी कुठलीही भूमिका बजावली नाही. त्यामुळेच ग्रामस्थांना सणासुदीच्या दिवसामध्ये पाण्याविना राहावे लागत आहे. अशी प्रतिक्रिया वडकी ग्रामपंचायत सदस्य शरद सराटे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...