आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:राहत्या घरी छताला दोर ; आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या

कळंब23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजारपणाला कंटाळून एका महिलेने आपल्या राहत्या घरी छताला दोर बांधून गळफास घेतला असून यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वडगाव येथे शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सिमा प्रशांत वडेकार वय ३० वर्ष असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

मृत सिमा ही डोक्याच्या आजाराने ग्रस्त होती. मात्र डोक्याच्या आजार ठीक होत नसल्याने ती चिंतीत होती. शुक्रवारी सकाळी वेदना असह्य झाल्याच्या कारणावरून सकाळी आपल्या राहत्या घरी वडगाव येथे आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...