आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी उपक्रम

दारव्हा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा द्वारा संचालित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव’ अंतर्गत कृषि दूत आयुष आंबोरकर, यश बोरसरे, अंकुश बुरडे, तुशार बोथले यांचा कृषी दुत ग्रुप प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत. भौतिक शुद्धता, अनुवंशिक शुद्धता व बीज उगवण क्षमता या बदल शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

साजेगाव येथील कृषी दूतांना प्राचार्य पी.ए.खाडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. वि. यू. देशमुख तसेच विषय तज्ञ प्रा. वी. जी गुल्हाने, प्रा. एस. बी. जरे, प्रा. के. एस. गवई यांचे कृषि दूतांना मार्गदर्शन लाभले. त्याबरोबरच प्रगतशील शेतकरी राजेश श्रीनाथ, भिकाजी श्रीनाथ, धनंजय बावणे, संतोष श्रीनाथ, विनय श्री नाथ व सरपंच मंगला मात्रे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...