आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक ठिकाणी निर्माण झाले जीवघेणे खड्डे:वाईगौळ ते धानोरा रस्ता दुरुस्तीकडे साबांविचे दुर्लक्ष

मानोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या तालुक्यातील वाईगौळ ते धानोरा ह्या मार्गाची दुरुस्ती आणि देखभाली अभावी प्रचंड दुरवस्था झालेली असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्यावरून जीवघेणे प्रवास करण्यास वाहनधारक बाध्य झालेले आहे.यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या आणि मानोरा तालुक्याच्या टोकावर असलेल्या वाई गौळ ह्या १६१ ए क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरून तीर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरी खुर्द, फुलउमरी, रतनवाडी, पाळोदी, शेंदुरजना आढाव ही बाजारपेठ असलेले गाव मार्गे तब्बल ३२ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्ग असलेला हा १९ क्रमांकाचा मार्ग मंगरूळ नाथ तालुक्यातील धानोरा या गावापर्यंत आहे. मानोरा तालुक्यातून जाणारा हा रस्ता मंगरुळनाथ तालुक्यातील धानोरा ह्या १६१ ई ह्या राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आलेला आहे.

वाई गौळपासून तीर्थक्षेत्र पोहरादेवी पर्यंतचे तीन किलोमीटर आणि पोहरादेवी पासून ते तीर्थक्षेत्र उमरी खुर्द दरम्यान या प्रमुख जिल्हा मार्गावर मोठमोठाले व जीवघेणे खड्डे निर्माण झालेले आहेत. उमरी खुर्द पासून शेंदूरजना आणि शेंदुर्जना आढावपासून शेगी फाटा पर्यंत काही अपवाद वगळता या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात गिट्टी उखडून मोठे-मोठे खड्डे अस्तित्वात आलेले असून खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी वाहनधारकांना नित्यनियमाने गंभीर दुखापती ही नवीन नाहीत. रस्ता निर्मितीच्या वेळी कंत्राटदाराकडून दर्जेदार बांधकाम साहित्य वापरले जाते किंवा नाही याकडे सार्वजनिक बांधकाम खाते का लक्ष देत नाही असा संतप्त सवाल हजारो प्रवासी या निमित्याने प्रशासनाकडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...