आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा जागरूकता:खाण कामगारांसाठी सुरक्षा जागरूकता ;  जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शिबिराचे आयोज

यवतमाळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विविध गैर कोळसा खदानी मध्ये कार्यरत कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी खाण अधिनियमाची माहिती तसेच ‘सिलिकोसिस’ या घातक बिमारी पासून बचाव करण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, जिल्ह्यातील गैर कोळसा खदान मालक व खाण व्यवस्थापक, गौण खनिजाशी संबंधीत सर्व खनिपट्टेधारक यांच्या उपस्थितीत पावर पॉईंट सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती खाण निदेशालयाचे निदेशक सागेश कुमार व उपनिदेशक एम. के. गुप्ता यांनी दिली. शिबीराचे आयोजन जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...