आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:सहयोग नगर स. पतसंस्थेतील 12 जणांवर आणखी दोन गुन्हे

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून पुन्हा दोघांची तब्बल सहा लाखाने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार घाटंजी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी सहयोग नगर स. पतसंस्थेतील बारा जणांवर पुन्हा फसवणुकीचे गुन्हे नोंद केले आहे.घाटंजी शहरातील महात्मा गांधी वार्डातील स्वप्नील भंडारी यांना सहयोग नगर सं. पतसंस्थेतील विनोद गवळी यांच्यासह अन्य बारा जणांनी इतर आर्थीक संस्थेपेक्षा जास्त व्याज देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर दि. १३ जुलै २०१३ ते दि. ५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ४ लाख ८३ हजार ९०३ रूपयाची गुंतवणूक केली होती.

तर घाटंजी शहरातील नेहरू नगरातील शेशावंती नगराळे यांनी दि. २७ मार्च २०१५ ते दि. १४ ऑक्टोबर २०१७ दरम्यान ५ लाख २४ हजार ४८२ रूपये गुंतवणूक केली होती. या दोन्ही प्रकरणी वेगवेगळ्या तक्रारीवरून घाटंजी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंद करण्यात आले. यात सहयोग नगर सं. पतसंस्था मर्या घाटंजी रं.न.९०६ येथील विनोद गवळी याच्यासह बारा जणांचा समावेश आहे. पुढील तपास ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...