आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन रखडले:आरोग्य विभागात कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटरचे तीन महिन्यांचे वेतन रखडले

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागात कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटचे गेल्या तीन महिन्यापासूनचे वेतन यशस्वी अकॅडमी स्किल कंपनीने अदाच केले नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या टाकल्या आहेत. या प्रकाराला कंटाळून डाटा एन्ट्री ऑपरेटरने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन दिले. त्वरीत वेतन अदा करावे, अशी मागणी केली.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारीत डाटा एन्ट्री ऑपरेटरचे नेमणूक पूणे येथील यशस्वी अकॅडमी स्किल कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पहिल्यांदा नेमणूक दिल्यानंतर वर्षभरात २० टक्के वाढ करण्याची शाश्वती कंपनीच्या वतीने देण्यात आली होती. सुरूवातीला कंपनीने डाटा एन्ट्री ऑपरेटरचे नियमित वेतन अदा केले. मात्र, मागिल तीन महिन्यापासून वेतन अदा केलेच नाही. परिणामी, डाटा एन्ट्री ऑपरेटर चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात त्वरीत निर्णय घेतला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारासुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...