आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:नायलॉन मांजा विक्री;‎ पालिकेची कारवाई‎

यवतमाळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मकर संक्रांतीच्या पर्वात शहरातील‎ पतंग विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात‎ पतंग व मांझादोरा स्टॉक केला‎ आहे. शौकीन ग्राहकांना आकर्षित‎ करण्यासाठी दुकानदारांनी बंदी‎ असलेल्या मांझादोऱ्याची‎ पडद्याआड विक्री करु नये म्हणून‎ मुख्याधिकारी तथा प्रशासक‎ दादाराव डोल्हारकर यांच्या‎ मार्गदर्शनात पालिका आरोग्य‎ विभागाच्या विशेष पथकामार्फत‎ पतंग विक्रेत्यांची तपासणी सुरू‎ करण्यात आली आहे.

त्यात‎ मंगळवार दि. ३ जानेवारी रोजी‎ करण्यात आलेल्या तपासणीत‎ वापरण्यास बंदी घातलेला मांझा‎ जप्त करण्यात आला.‎ पालिकेच्या आरोग्य विभागाचे‎ विशेष पथकाने सकाळपासुन‎ शहरातील पतंग-मांजा विक्रेता‎ यांच्या दुकानाची तपासणी सुरू‎ केली. त्यात बंटी पतंगवाला‎ मारवाडी चौक, गुरुनानक जनरल‎ स्टोअर्स, बंटी पतंग सिंधी कॅम्प,‎ साक्षी पतंग आणि संकेत जनरल‎ स्टोअर्स जय-विजय चौक इत्यादी‎ ठिकाणी या पथकाने तपासणी‎ केली.

त्यात विक्रीसाठी उपलब्ध‎ मांझा-दोरा तपासला असता दोन‎ दुकानात वापरण्यास घातक‎ असलेला मांझा-दोरा आढळून‎ आला. त्यामुळे तो घातक मांजा‎ जप्त करण्यात आला. या पथकात‎ मिलिंद घुले आरोग्य विभागप्रमुख‎ यांच्यासह आ. नि. राहुल‎ पळसकर, अशोक मिसाळ, लता‎ गोंधळे, नंदु मुळे, शेख साजिद‎ आणि अन्य कर्मचारी यांचा‎ समावेश होता.‎

बातम्या आणखी आहेत...