आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:आरोग्य विभागातील प्रसिद्धी साहित्याची विक्री

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य अभियानांतर्गत प्राप्त झालेले आणि खरेदी केलेले प्रसिद्धी साहित्य रद्दीत विक्री केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

जिल्हा आरोग्य विभाग, आरोग्य अभियानाला पूणे सहसंचालक कार्यालयाकडून विविध कार्यक्रमांतर्गत अनेक प्रकारच्या प्रसिद्धी साहित्याचा पुरवठा होतो. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर तीन विभागांतर्गत प्रसिद्धी साहित्याची छपाई केल्या जाते. बरेच साहित्य बाहेर ठेवल्या जाते. काही साहित्य जिल्हा कार्यालयात अडगळीत पडून आहे. कार्यक्रम संपताच सदर साहित्याची रद्दी विक्री केल्या जाते. विशेष म्हणजे आरोग्य अभियानाची पद भरती आणि जूनी पद भरती संदर्भातील काही रेकॉर्डचे साहित्य वरिष्ठांची मान्यता न घेता विक्रीचा आरोप तक्रारीतून केला आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातील बहुतांश कामे स्वराज आणि पंकज ह्या फर्मला देण्यात येते. निविदा मॅनेज करण्याच्या दृष्टीने अटी ठरविल्या जात असल्याचाही आरोप निवेदनातून केला. जिल्हास्तरावर साहित्याची छपाई होते. मात्र, व्हाऊचर बुक आणि स्टॉक बुक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नाही. एकंदरीत प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चौकशी समिती नेमावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिलेल्या निवेदनातून अशोक जयसिंगपूरे यांनी केली आहे.

कोविड काळातील साहित्यात गौडबंगाल
कोविड काळात प्रसिद्धीचे साहित्य मोठ्या प्रमाणात छापण्यात आले. हे प्रसिद्धी साहित्य आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर वितरीत करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले, परंतू कुठल्या वाहनातून साहित्य वितरीत केले, याचीसुद्धा चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून केली.

बातम्या आणखी आहेत...