आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड जिल्हा धर्माबाद तालुक्यातील सालेगाव ते दत्त संस्थान माहूर गड २०० किमी अंतराची पायी दिंडी यात्रेचे उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर फाटा येथून मार्गक्रमण होत आहे. या यात्रेत ३०० महिला व पुरुषांनी सहभाग घेवून रोज २० किमी अंतर पायी चालत माहूर गडाकडे आगेकूच करत आहेत. मजल दरमजल करत श्री. संत अरूण महाराज पुरी यांच्या नेतृत्वात पायी दिंडी यात्रेला २८ जानेवारीपासून सुरूवात झाली असून १ फेब्रुवारीला उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर फाटा येथे दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी अरूण महाराज पुरी यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी दिंडीचे महत्व विषद केले. ते म्हणाले की, आपल्या परंपरेत कोणतीच यात्रा केवळ रस्त्यावरचे अंतर कापण्यासाठी होत नसते. केवळ फिरणे हा या मागचा उद्देश नसतो. प्रत्येक यात्रा ही मनाची आणि विचारांची पेरणी करणारी असते. शरीराचा व भक्तिमय भजनांचा संचार हा समाज जागे करण्याचे माध्यम असते. आम्ही देखील पायी दिंडी यात्रेच्या माध्यमातून समाजातील अंधश्रध्दा, व्यसनाधीनता व खुळचट चालीरीती यांच्यावर प्रहार करून समाज जागृतीचे काम करत आहे.
तसेच पायी दिंडी यात्रा ही शारिरीक तपस्येच्या माध्यमातून मनाची साधना आणि विचार मंथन घडवणारी मोठे साधन आहे. ही यात्रा धर्माबाद तालुक्यातील मोखंडी, भोकर, हिमायतनगर तालुक्यातील वडगाव, दिघी, उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर महादापूर, येथे श्रीदत्त प्रभूचे गुणगाणगावुन भजन, किर्तन करून आणि होम हवन करून भक्त मंडळींना मार्गदर्शन करणार आहोत. दि. ३ फेब्रुवारी पौर्णिमेच्या दिवशी यापायी दिंडी सोहळ्याची समाप्ती होणार आहे.
या वारीत मृदंग वादक हनुमंत पाटील शिंदे, पेटी वादक संभाजी सूर्यंवशी, गायनाचार्य बालाजी मोरे, भजन करी विठ्ठल धारजने, तानाजी वडजे, गुरुकृपा भजनी मंडळ सालेगाव, महापूजा मांडणी विठ्ठलराव पाटील, मारोतराव भायेगाये, भोपाळी पंडितराव भुताळे, मोहनराव गोमासे, दत्तराम रामखडक, व दिंडी सहायक सालेगाव, डेरला, पातोडा, तानुर, येळवी, वाडवणा, हंगरगा, रामटेक, इत्यादी गावातील महिला मंडळी या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.