आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीबॉल:हॉलीबॉल स्पर्धेत साळुंकाबाई राऊत‎ महाविद्यालयाचा संघ राज्यस्तरावर‎

मंगरुळपीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा‎ येथील साळुंकाबाई राऊत कनिष्ठ महाविद्यालयाचा‎ १९ वर्षांखालील संघ कारंजा लाड येथे खेळल्या‎ गेलेल्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी‎ झाला. त्यांनी अमरावती महाविद्यालयाचा २५-५,‎ २५-७ असा पराभव केला. या विजयासह श्रीमती‎ साळुंकाबाई राऊत कनिष्ठ महाविद्यालयाच्या‎ संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.‎

महाविद्यालयातील चमूत हर्ष बुंदेले, दीपेश‎ सोळंकी, अनिरुद्ध फरताडे, राम राऊत, समीर‎ शहा, आदित्य राऊत, गोपाल काळे, राहुल पावशे,‎ सरोश माझ, गौरव वाघमोडे, प्रेम इंगळे यांचा‎ समावेश होता. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य‎ डॉ. देवेंद्र गावंडे, प्रशिक्षक अमोल ठाकरे, क्रीडा‎ शिक्षक प्रा. तृषाल राऊत, प्रा. दिलीप मुंदे, गणेश‎ राऊत गजानन बाईस्कार, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी‎ यांना दिले. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक संस्थेच्या‎ अध्यक्षा कमल राऊत, सचिव सुशीला राऊत यांनी‎ विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.‎

बातम्या आणखी आहेत...