आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात शासकिय, निमशासकीय शाळा महाविद्यालयात बहुजन उद्धारक क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी पातुर्डा ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला सरपंच रणजीत गंगतीरे, उपसरपंच नीलेश चांडक, ग्रामविकास अधिकारी एस.पी.मेंहेंगे, ग्रा.पं.सदस्य यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच बहुजन समाज बांधवांनी आठवडी बाजार येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला राधाकृष्ण मंदिर संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बगाडे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक राम निमकर्डे, शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुख रविन्द्र झाडोकार, माजी सैनिक साहेबराव वानखडे, शरद तायडे, आठवले गटाचे पंजाबराव वानखडे, ज्ञानेश्वर तायडे, गोपाल बोपले, अनंत सातव, आदींनी अभिवादन केले. तर तहसील कार्यालयात तहसीलदार मुरलीधर गायकवाड नायब तहसीलदार चव्हाण, उकर्डे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण केले. यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चंप्पू चांडक, रामदास म्हसाळ, अजय राहाटे, दिनकर इंगळे, प्रकाश उगले, श्रीकृष्ण ढोकणे, अरुण धर्माळ, सुनील तायडे, कृषि सहाय्यक अढाव, पंजाब इंगळे यांच्यासह समाज बांधव होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.