आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठे यांची जयंती:साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे अन् लोकमान्य टिळक यांना अभिवादन

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी या महापुरुषांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला.

दिग्रस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ४९ वर्षाच्या कालावधीत त्यांनी दीड दिवस शाळेत जाऊन कादंबरी, पोवाडे, कवी लेखन, कविता संग्रह ,लघु कथा, पटनाट्य आदी साहित्य समाजाच्या उत्थानासाठी प्रसिद्ध केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. डॉ. बाबासाहेबांनी जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव या म्हणी प्रमाणे समाजावर शिक्षणाचे घाव घालून त्यांना सुशिक्षित करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षित बनविण्यासाठी प्रयत्न करावे व अण्णा भाऊंच्या विचाराचे आचरण करावे असे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख यांनी व्यक्त केले.

दिग्रस तालुक्यातील चिंचोली क्रमांक २ येथे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंतीनिमित्त वृक्षारोपण व जयंती अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर देशमुख, सरपंच हरीश मनवर, सदस्या मंगला स्वर्गे, समतादूत ज्योत्स्ना जांभुळकर, ज्ञानेश्वर बडोले, सुदाम इंगोले, वैदही कांबळे, किशोर कांबळे, भावराव मनवर, सतीश जयस्वाल, अभय इंगळे, दिलीप इंगोले, रितेश चव्हाण, कविता साळवे, उमेश साळवे, दशरथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी वृक्षारोपण करून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मातंग समाजातील नागरिक उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतावादी
यवतमाळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याच्या इतिहासात पहिल्यांदा भटके-विमुक्त, अपेक्षित-दुर्लक्षित,शोषित-पीडित, वंचितांना साहित्यात मानाचे स्थान दिले. तसेच त्यांनी पहिल्यांदा स्त्रियांना सन्मानाने साहित्यात प्रतिष्ठित केले. स्त्रियांना प्रभावीपणे मानाचे स्थान देणारे अण्णाभाऊ साठे पहिले साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्य लेखनाने मराठी साहित्याचे दालन समृद्ध झाले. अण्णा भाऊंच्या नायक नायिका कठीण प्रसंगी विवेकाने लढतात. बुद्ध, फुले, शाहू कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव दिसून येतो.

त्यांच्या साहित्यातील नायक नायिका कचखाऊ नसून स्वाभिमानी बाणेदार आणि लढाऊ आहेत.अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहून समाजातील प्रश्न आणि समस्यांचे मुळापासून निराकरण करतात.अन्यायाला समर्थपणे वाचा फोडतात,स्वतः जगतात आणि समाजाला जगवतात. अण्णा भाऊंचे नायक समतावादी आणि न्याय प्रिय आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय,जगा आणि जगू द्या असे विज्ञानवादी साहित्य अण्णा भाऊंनी लिहिले म्हणून त्यांना जागतिक कीर्तीचे साहित्य सम्राट या उपाधीने गौरविले गेले.अण्णा भाऊंनी पहिल्यांदा वैश्विक दुःखाला वाचा फोडली.

माणसाने माणसाला माणसाचे हक्क प्रदान करणे प्रत्येक माणसाने दुसऱ्याच्या आत्मिक- भौतिक संपन्नतेसाठी प्रयत्नरत राहणे हा मानवतावाद अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात दिसून येतो. या अनुषंगाने अण्णा भाऊ साठे मानवतावादी साहित्यिक आहेत. असे प्रतिपादन प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी जागर सेवा मंच यांनी आयोजित आदर्श नगर येथील जयंती कार्यक्रमात केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्या कामटकर संचालन नलिनी सरकटे तर उपस्थितांचे आभार शेखर सरकटे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी श्याम कुमार कामटकर, सुरेश पवार, सुमित भागवत, मोहिनी रेखाते, विश्वास खंडारे यांनी परिश्रम घेतले.

न्यू इंग्लिश हायस्कूल येथे टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती
राळेगाव|न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सोमवार,दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, संस्थेचे माजी सचिव केशवराव चिरडे यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रा. जितेंद्र जवादे तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब धर्मे, संस्थेच्या सचिव डॉ. अर्चना धर्मे, उपप्राचार्य विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे, शिफ्ट इन्चार्ज अरुण कामनापुरे उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन किशोर उईके यांनी तर आभार सूचित बेहरे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...