आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मसमर्पण:संदीप तोटे हत्या प्रकरण; आणखी तिघांना अटक

दारव्हा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिका माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या हत्ये प्रकरणातील मारेकरी संदीप तोटे न्यायालयात तारखेवर जात असताना त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना शुक्रवारी भरदिवसा शहरातील बसस्थानक परिसरात घडली होती. या प्रकरणी सर्वप्रथम ओम दुधे याने आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर रविवारी यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेली रिवॉल्वर आणि काेयते जप्त केले असून, न्यायालयाने त्या तिघांना १० ऑक्टोबरपर्यंतची कोठडी सुनावली आहे.

ज्ञानेश्वर महादेव मोहतुरे वय ५० रा. भुलाई, शैलेश विनोद बदुकले २२ आणि अभिमन्यू अर्जुन दुधे ३४ दोघेही रा. दारव्हा अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहे. दारव्हा शहरातील बसस्थानक परिसरातील देशी दारू दुकानाजवळ न्यायालयात तारखेवर येत असलेल्या संदीप तोटेची भरदिवसा बंदुकीची गोळी झाडून हत्या केली होती. वडिलांच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नात असलेला मुलगा ओम दुधे याने दोन मित्रांसह हा कट रचला होता.

बातम्या आणखी आहेत...