आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस दलातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रीया पोलिस कवायत मैदान येथे सुरू झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या भरतीसाठी येणाऱ्या गरजू उमेदवारांना जेवणासाठी भटकंती करावी लागु नये यासाठी संकल्प फाउंडेशनच्या पुढाकारातून अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी भरतीसाठी येणारे सर्व उमेदवार आणि भरती प्रक्रीया राबवणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. २२ दिवस चालणाऱ्या या भरती प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही भोजनसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार संकल्पने केला आहे. पोलिस कवायत मैदानावर सोमवारपासून पोलिस भरतीला सुरवात झाली आहे. त्यात राज्यभरातून विद्यार्थी सहभागी होणार आहे.
त्यांच्या भोजनाची व्यवस्था संकल्प फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली असून महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशन शाखा यवतमाळ त्यांना मदत करीत आहे. पुढील २० दिवस ही भरती प्रक्रीया सुरू राहणार आहे. यादरम्यान दरदिवशी दुपारी १२ ते २ या वेळात भरतीसाठी येणाऱ्या शेकडो उमेदवारांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. मंगळवारी दिवसभरात ११०० उमेदवारांनी भोजन सेवेचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी मैदानी चाचणी असलेले उमेदवार रात्रीच मुक्कामासाठी येत आहे. अशा उमेदवारांना रात्रीचे जेवण देण्याची व्यवस्थाही संकल्पच्या वतीने करण्यात आली आहे. तब्बल २२ दिवस चालणाऱ्या ह्या भरती दरम्यान सर्व उमेदवार, पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या भोजनाची जबाबदारी सर्व यवतमाळ करांच्या मदतीने करण्याचा संकल्प केला आहे.
यासोबतच उघड्यावर रात्र काढणाऱ्या उमेदवारांसाठी निवासाची व्यवस्था इंदिराजी ट्रस्टचे संस्थापक प्रवीण देशमुख ह्यांच्या पुढाकाराने याच ठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान २ जानेवारी रोजी या भोजन सेवेची सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड ह्यांनी स्वतः उमेदवार विद्यार्थ्यांना भोजन सेवा दिली. त्यांचे सोबत अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे उपस्थित होते.
संकल्पला लोकसहभागाची मोलाची मदत
भरतीसाठी यवतमाळ शहरात येणाऱ्या एकाही उमेदवाराला उपाशी रहावे लागु नये यासाठी संकल्पने भोजन व्यवस्था उपलब्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी फाउंडेशनचे ५५ ते ६० सदस्य अविरत कार्यरत असुन लोकसहभागातून हा गाढा ओढला जात आहे. त्यासाठी यवतमाळकरांची मोलाची मदत मिळत असल्याने संपुर्ण २२ दिवस हा भोजनाचा यज्ञ सुरू राहणार आहे.- प्रलय टीप्रमवार, संकल्प फाऊंडेशन, यवतमाळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.