आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता बंद:जिल्ह्यात सोमवारी संततधार, यवतमाळ-दारव्हा रस्ता बंद

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसाला सुरूवात झाली होती. तर रविवारी पावसाची भुरभुर सुरू होती. मात्र, मध्यरात्रीपासून पावसाने संततधार चालूच ठेवली होती. अशात सोमवार, दि. १५ ऑगस्ट रोजी दिवसभर संततधार पाऊस पडला. त्यामुळे जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली. अशात अडाण नदी पात्रात पाण्याचा येवा वाढलेला होता. त्यामुळे यवतमाळ-दारव्हा मार्ग २४ तास ठप्प होता. मंगळवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रस्ता पूर्ववत झाला.

आतापर्यंत पडलेल्या पावसाने यंदा सरासरी ओलांडली आहे. जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर ऑगस्टमध्ये सुद्धा मागिल आठवड्यात सलग चार ते पाच दिवस पाऊस कोसळला. तद्नंतर तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री हजेरी लावलेल्या पावसाने साधारणत: अडीच ते तीन तास जोरदार बॅटींग केली. तर रविवारी सकाळपासून पावसाची भुरभुर चालू होते. दिवसभर पावसाने उघडीप घेतली नव्हती. सोमवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सुसाट वाऱ्यासह रिमझिम पाऊस सुरू होता. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे छोट्या, मोठ्या नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. अशात अडाण नदी पात्रातही पाण्याचा प्रवाह वाढला होता. अशात दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील अडाण नदीच्या पूलावरून पाणी वाहत होते. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दि. १६ ऑगस्ट रोजी पावसाने उघाड घेतली. तरीसुद्धा रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहतूक सुरळीत झालीच नव्हती. तर सायंकाळी साडेसहा वाजता पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली.

दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा
१५ ऑगस्ट रोजी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील अडाण नदीच्या पूलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे रस्ता सोमवारी सायंकाळी ६ वाजता बंद पडला होता. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...