आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडीपार:सराईत गुन्हेगार संदीप वर्षभरासाठी तडीपार

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सराईत गुन्हेगारांची यादी बनवून त्याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत आहे. नुकतेच बाभुळगाव तालुक्यातील उमरी स्मारक येथील सराईत गुन्हेगार संदीप पाटील वय ४१ वर्ष याला शनिवार, दि. ५ नोव्हेंबरला वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी यवतमाळ उपविभागात कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सराईत गुन्हेगारांची यादी बनवून त्याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत आहे.

बाभुळगाव तालुक्यातील उमरी स्मारक येथील सराईत गुन्हेगार संदीप पाटील याला वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बाभुळगाव ठाणेदार रवींद्र जेधे, सहायक पोलिस निरीक्षक संदिप पाटील, कर्मचारी अशोक गायकी, विजय बॉम्बेकर, काशीनाथ राठोड, पवन नांदेकर यांनी पार पाडली.

दोन वर्षात तिघांना हद्दपार, तर तिघांवर एमपीडीए
सन २०२१ मध्ये बाभुळगाव पोलिसांनी तीन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना वर्षभरासाठी जिल्हा कारागृहात स्थान बध्द केले. दरम्यान २०२२ मध्ये आतापर्यंत तीन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. बाभुळगाव ठाण्याच्या हद्दीतील ज्या गुन्हेगारांवर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. अश्या गुन्हेगारांची यादी पोलिसांकडून तयार करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...