आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नागपंचमी पर्वावर सर्पमित्र आर्यन कवाडे; निखिल जाधव यांचे आवाहन

मारेगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात सापाचे वास्तव्य सर्वत्र असल्याने भितीपोटी व अज्ञानापाई सापाला मारण्याचे काम होत असते. मात्र साप हे त्यांना इजा झाल्याशिवाय कुणालाही दंश करित नाही. धार्मिक दृष्टीने सापाला देव मानणारा वर्ग आहे. मात्र अनेक जण सापाची मारून पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे घातक प्रयत्न करित असतो. नागपंचमीला सापाची पुजन करुन त्याला इतर दिवशी मारण्याचे काम सोडुन द्यावे, असे आवाहन मारेगाव तालुक्यातील सर्पमित्र आर्यन कवाडे व निखिल जाधव यांनी प्रतिनिधी जवळ केले आहे. या सर्प मित्रानी आजपर्यंत साडेचारशे सापांना पकडुन वन विभागाच्या सहकार्याने वनपरीसरात जीवदान दिले.

मानवाला निसर्गाने हवा पाणी, खनिज संपत्ती, विविध प्राणी, पक्षी, साप व विविध जीवजंतू पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उत्पन्न केले. मात्र आज निसर्गातील या अनमोल देणगीचा मानवाच्या स्वार्थी स्वभावाने नायनाट होत असुन निसर्गाचा हा अनमोल ठेवा शाबूत ठेवण्यासाठी मानवाने दक्ष होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या समाजात सण उत्सवाच्या माध्यमातुन नागपंचमीला नागाची पुजा करुन पर्यावरण रक्षण करण्याची आराधना मुख्येता शेतकरी वर्ग करित असतो. मात्र उतर दिवशी गैरसमजाने त्याच सापाला मारण्याचे काम सुध्दा होत असते.

सापांना मारणे म्हणजे पर्यावरणाची हाणी हे माहीत असुन आज घडीला सर्वत्र असमजातुन सापांना मारणे सुरु असुन हे वाचविण्यासाठी सर्पमित्र मोलाची भुमिका बजावत असुन आपला जीव धोक्यात टाकत समाजातील नागरिकांचे प्रबोधन करुन पर्यावरण रक्षणाला खऱ्या अर्थाने हातभार लावत असतो. सापांच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा दुर करण्यात काम सर्पमित्र, साप प्रेमी करीत असुन, नागपंचमीला सापाला दुध पाजणे ही एक अंधश्रद्धा असल्याच वास्तव लोकांनी स्विकारुन नाग हे शेतकऱ्यांचे मित्र आहे असा विचार करुन सापाची हत्या कुणीही करु नये असे आवाहन सर्पमित्र आर्यन कवाडे व निखिल जाधव यांनी केले आहे.

पावसाळ्याच्या दिवसात बहुतेक ठिकाणी साप निघत असते. जनतेनी घाबरुन न जाता घरी व वास्तव्याच्या ठिकाणी साप निघाल्यास सर्प मित्राला बोलावून सापाला जीवदान द्यावे, साप कुणाचाही डाव पकडत नाही. सापाला कान नसल्याने साप आपल्या भक्षाचा शोध जमिनीच्या कंपनातुन घेत असल्याची माहिती सर्प तज्ञ देत असताना नागरिकांनी सापाला भिण्याचे कारण नाही, सर्पमित्र आर्यन कवाडे व निखिल जाधव यांनी साडे चारशे विषारी बिनविषारी सापाला पकडून वन विभागाच्या सहकार्याने जीवदान दिल्याची माहिती सर्पमित्र आर्यन कवाडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...