आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरसकट ओला दुष्काळ जाहिर करा:सरपंच संघटनेची जिल्हा कचेरीवर धडक ; नुकसान भरपाईची मागणी

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका ओला दुष्काळ जाहिर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीचे निवेदन बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.संध्या परिस्थितीमध्ये मागील काहि दिवसांपासून जिल्ह्यात प्रचंड संततधार पाऊस सुरू असून सततच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे सर्व पिके जळाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यवतमाळ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी दुबार- तिबार पेरणी केली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पावसामुळे खरडून गेले आहे. यावेळी उमेश चव्हान, दिनेश पवार, पुरूषोत्तम टिचुकले, बाबाराव चव्हान, सचिन बेडेकर, प्रेम पवार, गजानन राठोड, योगेश मानकर, संदिप राठोड, प्रमोद नाटकर आदी सरपंच उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...