आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाचखेड ग्राम पंचायतीत जानेवारी २०२२ पासुन ग्रामसभा ग्रामसेवक यांनी आयोजित केली नाही. त्याच प्रमाणे २६ जानेवारी व १ मे रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभा ह्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतल्या. त्यामुळे गावातील समस्यांचे निवारण करता आले नाही. आता गावातील महिलांनी सरपंच, सचिव यांनी विशेष ग्राम सभेचे आयोजन करावे व त्यासाठी सरपंच, सचिव यांना आदेशित करण्यात यावे, असे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
गावातील पाणंद रस्त्याचे ठराव देण्यास ग्रामपंचायत प्रशासन नेहमीच टाळाटाळ करते, गावातील समस्या सोडवण्यासाठी ग्रामसभा घेवुन त्यात ठराव पारीत करणे आवश्यक आहेत. असे होत नसल्याने गावाचा विकास खुंटला आहे. आगामी पावसाळ्या आधी अनेक कामे ग्राम पंचायतीने करणे आवश्यक आहेत. त्यामुळे विशेष ग्रामसभा बीडीओ यांच्या मार्गदर्शनात ग्रामसेवकाने घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. येथील रोजगारसेवक हा तीन गावांचा कारभारी असुन एकाच वेळी तीन ठिकाणाहून मानधन घेत आहे.
याबाबत ग्रामसेवकांना लक्षात आणुन दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नविन रोजगार सेवकाबाबत ठराव घेण्यास सरपंच, सचिव टाळाटाळ करीत आहेत. असे निवेदनातून नमुद करण्यात आले आहे. या निवेदनावर मनिषा देशमुख, दिपाली कुरवाडे, सुनंदा पारिसे, शोभा परतपुरे, लिला बावणे, कुंदा आमझरे, रंजना कुयटे, लिला पचारे, मुस्कान शेख फिरोज, पारू पचारे, शिला मुन, स्वाती खडसे, माया कांबळे, शशिकला कांबळे, मीरा पारिसे, मंदा पचारे, सुभद्रा कैलुके, निरंजना कुयटे, सीमा बरडे, सुवर्णा बरडे, सारस्वता पारिसे, खैरूंनीसा सुभेदार खान, वहिदा शेख हारून आदिंच्या स्वाक्षरी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.