आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीचा‎ मृतदेह आढळा:सावरगड खून; आणखी एकाला अटक‎

यवतमाळ‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून काही अंतरावर‎ असलेल्या सावरगड येथे नितू‎ सावध या २५ वर्षीय बेपत्ता तरूणीचा‎ मृतदेह आढळून आला होता. या‎ प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा‎ नोंदवून तेलंगणा राज्यातून एकाला‎ अटक केली होती. या प्रकरणात‎ गुरुवारी आणखी एकाला अटक‎ करण्यात एलसीबी पथकाला यश‎ आले. शरीफ उर्फ शाहरूख सय्यद‎ रऊफ वय २३ वर्ष रा. कुंभार‎ मोहल्ला कळंब चौक, यवतमाळ‎ असे अटक करण्यात आलेल्या‎ तरूणाचे नाव आहे.‎ सावरगड शिवारात दि. ६ सप्टेंबरला‎ नितू सावध या तरूणीचा मृतदेह‎ आढळून आला होता.

मृत तरुणीच्या‎ आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या‎ तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद‎ केला होता. हा खून इंदिरा नगरात‎ राहणाऱ्या आरिफ अली आबीद‎ अली याने केल्याचा आरोपही‎ तक्रारीतून केला होता. अशात‎ आरोपी तेलंगणा राज्यातील‎ आदिलाबाद येथे असल्याची‎ माहिती मिळाली होती. तर जुगार‎ खेळण्यासाठी किनवट येथे आरोपी‎ नियमितपणे येत असल्याची माहिती‎ पोलिसांना मिळाली. मिळालेल्या‎ माहितीच्या आधारावर ग्रामीण‎ पोलिसांनी किनवट येथून आरोपी‎ आरिफ अली आबीद अली याला‎ ताब्यात घेतले होते. मात्र यातील‎ दुसरा साथीदार फरारच होता‎

बातम्या आणखी आहेत...