आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन १९४० ते २०२०अशा नऊ दशकातील हजारो माजी विद्यार्थी व शिक्षकांचा अनोखा व भावपूर्ण स्नेह मिलन सोहळा रविवारी अकोला बाजारवासीयांनी अनुभवला. अकोला बाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला १२५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात तब्बल नऊ पिढ्यांमधील माजी विद्यार्थी एकत्रित आले होते. माजी विद्यार्थी आपली शाळा, गाव, सवंगडी व शिक्षकांच्या ओढीने मोठ्या संख्येने शाळेत एकत्रित आले होते. यानिमित्ताने अकोला बाजार हे गाव व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही शाळांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी एक दिवस गावासाठी देण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला.
या कार्यक्रमात प्रमिलाबाई जयस्वाल, यादवराव रामटेके, अॅड. रामप्रसाद मनक्षे व डॉ. लखनलाल जोशी या स्वातंत्र्यपूर्व काळात शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेला १२५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लावलेले विशेष फलक, जुन्या वस्तूंची प्रदर्शनी, जुन्या आठवणींनी उजाळा देणाऱ्या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. रामप्रसाद मनक्षे तर माजी मुख्याध्यापक एम. पी. शेरेकर होते.
या स्नेह मीलन सोहळ्यात विठ्ठल पाडवार, डॉ. एन के पुराणिक, डॉ. सीमा शेंडे, डॉ. विनोद मनक्षे, सचिन निंबाळकर, सुमित अग्रवाल, शीला मोवाडे भवरे, अविनाश पाम्पट्टीवार, शिवानंद पेढेकर, भारत वर्मा, अविनाश दुधे, शुभम ठाकरे, कृष्णा कावळे, सूरज जयस्वाल, मधुर मनक्षे, विजय पुरी, लक्ष्मण कपाट, संजय जगताप आदी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षक मारोती काळेकर, ज्योत्स्ना पांडे, सुनीता काळे, फुलचंद धुप्पड, लीलाधर खडसे, राजगुरे, रोहणे, बोलेवार, कृष्णराव कांबळे, आर. व्ही. होटे, भाकरे, ताई काकडे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी अॅड. रामप्रसाद मनक्षे , हरिभाऊ लेले, राधेश्याम चेले, डॉ. पुराणिक, डॉ. सीमा शेंडे, डॉ. विनोद मनक्षे, सचिन निंबाळकर, शिवानंद पेढेकर, भारत वर्मा, खडसे , राजगुरे, धुप्पड, वंदना खराटे, शुभम ठाकरे, नरेंद्र सिंग चव्हाण या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केला. सुनील कन्नावार यांच्यातर्फे वाचनालय साहित्य, अमोल माळे, संतोष अग्रवाल, राजू काटपेलवार, मधुकर डाखोरे , विजय वट्टी यांनी पाच मॅटिन भेट देण्यात आले. प्राथमिक शाळेत कार्यक्रमाचे संचालन विनोद डाखोरे व माध्यमिक शाळेत ओंकेश्वर हिवराळे, प्रास्ताविक हमीदखां पठाण आणि आभार उदय जोशी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.