आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान:कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने शाळेला ठोकणार कुलूप; स्वाभिमानी चे विशाल पवार यांचा इशारा

महागावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोनदरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी व विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या ठिकाणी तत्काळ चार शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव विशाल पवार यांनी दिला आहे.महागाव तालुक्यातील कोनदरी येथे जिल्हा परिषद शाळा असून शाळेमध्ये १ ते ५ पर्यंत वर्ग आहे. या एकुण वर्गातील पटसंख्या २१२ आहे, या २१२ विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी मागील बऱ्याच वर्षांपासून केवळ दोनच शिक्षक पार पाडत आहेत.

त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच कारणामुळे गावातील अनेक पालकांनी आपले पाल्य बाहेरगावी शिक्षणासाठी पाठविले असून या पालकांना इतर ठिकाणांवरील शिक्षणाच्या खर्चाचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे येथील पालकांना तो खर्च झेपावत नसल्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव विशाल पवार यांनी महागाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन येथील जिल्हा परिषद शाळेला तात्काळ कायमस्वरूपी चार शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांची नेमणूक न झाल्यास येत्या दि. ८ सप्टेंबरला शाळेला कुलूप लावून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी अनेक पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...