आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानाचा प्रसार व प्रचार:विज्ञान नाट्योत्सवात चन्नावार विद्यालय प्रथम ; विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन बुधवार, दि. ७ सप्टेंबरला महाजन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी येथे करण्यात आले होते. विज्ञानाचा प्रसार व प्रचार होवुन विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या करिता दरवर्षी विज्ञान नाटिकेचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात येते. ह्या वर्षी एकूण सहा शाळांनी या नाटिका स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या सर्व शाळांनी आपले उत्तम सादरीकरण त्या ठिकाणी केले. ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण हे रामाजी चन्नावार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करून प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी तमसो मा ज्योतिर्गमय” या नावाखाली एक देखणा प्रयोग सादर करून जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग करून आपण जनकल्याण, लोकहित जोपासून शकतो. हे या नाटिकेच्या माध्यमातून विज्ञान व आरोग्य यांच्या मुलाखतीतून उलगडत जावुन पुढे ज्योतिबा व सावित्री निर्माण केलेली ज्ञानाची गंगा हा प्रवास या नाटिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आले कथेचे लेखक व दिग्दर्शक शिक्षक अमित राऊत हे होते. तर संगीताची साथ व नेपथ्य वर्ग दहावीच्या विद्यार्थी क्रिष्णा दामेधर याने सादर केले. नाटकातील भूमिकेत असलेले कलाकार वर्ग दहावीचे प्रशिक डोंगरदिवे, अर्जुन बोदडे, वंश चपरिया, पियुष वाघाडे, आदित्य राऊत, वेदिका दरणे, एकता डाखोरे, मोहिनी जाधव होते. यांच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर नाटकाला पहिले पारितोषिक मिळाले. नाटकाच्या या उत्कृष्ट यशा बद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा कोलतेवार यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव चन्नावार यांनी चमूला हार्दिक शुभेच्छा देवुन सगळ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...