आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांशी संवाद साधताना मेंदूत विचार येणं हेच तुमच्या अंतरंगातील वैज्ञानिक लक्षण आहे. त्यामुळे विचार यायला हवे, कल्पना सुचायला हव्या व समस्यांचे संधीत रूपांतर करायला हवे तरच विज्ञान हे वरदान ठरेल, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. दिग्रस विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूल येथे दि. २८ जानेवारीला ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा निपुण भारत अंतर्गत शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन पंचायत समिती दिग्रसच्या वतीने घेण्यात आले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ते बोलत होते.
विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात ३९ प्रयोग, माध्यमिक गटात २८ प्रयोग तर शिक्षक प्रतिकृती गटात ३ शिक्षक सहभागी झाले. विद्यार्थी प्रतिकृती तथा शिक्षक प्रतिकृतीचे तज्ञ विज्ञान शिक्षक प्रा. व्ही. एन. झंवर, प्रा. संतोष सोळंके, प्रा.पवन गावंडे, प्रा.हितेश राठोड यांनी परीक्षण केले. प्रत्येक गटातून उत्कृष्ट तीन प्रयोगांची निवड केली. स्पर्धेचे बक्षीस वितरण यवतमाळ जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावर यांचे हस्ते करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला दि. २७ जानेवारी २०२३ रोजी तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी रमेश खरोडे, गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, विस्तार अधिकारी शुभदा पाटील, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय विश्वकर्मा, यशदा प्रशिक्षक तथा उपक्रमशील शिक्षक प्रसाद देशपांडे, विद्याभारती शाळेचे मुख्याध्यापक अमोल खिल्लारे हे उपस्थित होते. तसेच बक्षीस वितरण सोहळ्यास विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक नितीन राऊत, केंद्रप्रमुख किरण बारशे व केंद्रप्रमुख हेमंत दळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी प्रतिकृती मध्ये प्राथमिक गटात ट्रान्सपोर्ट अँड इनोव्हेशन व माध्यमिक गटात स्पेस अँड एनवोर्मेन्ट कन्सर्न या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल च्या बाल वैज्ञानिकांनी तयार केलेल्या विज्ञान प्रति कृतींना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. देवेश लाहोटी, कुंज निमोदिया आणि अथर्व राऊत तथा प्राची कोपनर, दिशिता निमोदिया, स्वर्निम सत्तुरवार या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूल तंजीला खलीखाऊ, वैष्णवी गुरगुडे व तृतीय क्रमांक दिनबाई विद्यालय दिग्रसचे अनुराग इंगोले यांनी प्राप्त केला तसेच माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक दिनबाई विद्यालय दिग्रसचे सौरभ पद्मावार, सार्थक कोशटवार यांनी तर तृतीय क्रमांक मोहनाबाई कन्या शाळा दिग्रसची वैष्णवी हेडगीर, सायली उंबरकर हिने पटकावला.
शिक्षक प्रतिकृती गटात प्राथमिक विभाग गिरीश साबळे विज्ञान शिक्षक जि प उच्च प्राथमिक शाळा महागाव यांच्या भौमितिक आकार व क्षेत्रफळ या साहित्यास प्रथम क्रमांक मिळाला. माध्यमिक विभाग भाग्यश्री गेडाम शासकीय निवासी आश्रम शाळा इसापूर यांच्या गृहोपयोगी टॉर्चला प्रथम क्रमांक तर प्रयोगशाळा सहाय्यक विभाग कु. आर. एन. मोरे यांच्या ''सेफ्टी स्लीपर '' या साहित्यास प्रथम क्रमांक मिळाला. कार्यक्रमाचे संचालन गट संसाधन केंद्र दिग्रसचे विज्ञान विभाग प्रमुख प्रशांत कवठकर व अश्विनी निमकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लता चव्हाण, जयश्री ढोले, गोपाल गंगापुरे, भारती सूर्यवंशी, महेश एंबल, राजेश राठोड यांचे सह विद्याभारती शाळा व पंचायत समिती शिक्षण विभाग दिग्रसच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.