आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्रस तालुक्यातील लाख रायाजी फाट्याजवळ एका दुचाकी स्वारास ट्रॅक्टरच्या जबर धडकेत एक जण ठार झाल्याची घटना दि. ६ मार्चला घडली. या अपघातात श्याम अशोक मोहाडे वय ३० वर्ष रा. महागाव ठार झाला होता. या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, महागाव येथील श्याम मोहाडे हा ज्युपिटर दुचाकी क्रमांक एमएच-२९- एच-६२२५ ने लाख रायाजी फाट्याकडून महागावकडे जात असतांना ट्रॅक्टर क्रमांक एमएच-२९-ऐके-१४११ ने दुचाकीला जबर धडक देऊन ट्रॅक्टर पसार झाला होता. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर जखमी अवस्थेत पडून होता.
पोलिसांनी त्याच रात्री रस्त्यावरील निशाण घेत रस्त्याची चाकोलीवरून अपघात घडवणारे वाहन लाख रायाजी येथील असल्याचे खात्री झाली. परंतु वाहन कोणते हे पोलिसांपुढे मोठे आवाहन होते. अपघात दुचाकी वाहनाचा रंग ट्रॅक्टर ट्रॉली खालील बाजूला लागलेला आढळला. यांनी अपघाताच्या रात्रीच लाख रायाजी गावात जाऊन तिन्ही ट्रॅक्टरची पाहणी केली होती. त्यावरून आरोपी ट्रॅक्टर चालक मालक मनोहर लोहेकर रा.लाख रायाजी यांच्यावर भादवी कलम २७९, ३०४ अ नुसार गुन्ह्याची नोंद केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.