आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकावर यवतमाळमध्ये गुन्हा:वाहनाच्या धडकेत सुरक्षारक्षकाचा मृत्यू; यवतमाळ-नागपूर मार्गावरील घटना

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तव्य पार पाडून दुचाकीने घरी जात असलेल्या सुरक्षा रक्षकाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ-नागपूर मार्गावर असलेल्या राणा जिनिंगसमोर रविवारी सायंकाळी घडली. शेख रफिक शेख जिलानी वय ४५ रा. वसीम ले-आऊट, यवतमाळ असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील वसीम ले-आऊटमधील शेख रफिक शेख जिलानी हे यवतमाळ-नागपूर मार्गावरील राणा जिनींगमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास शेख रफिक हे ड्यूटी आटोपून घराकडे दुचाकी क्रमांक एमएच-४०-ई-८०२९ ने जात होते. अशातच राणा जिनिंगसमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत शेख रफिक शेख जिलानी यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिस आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान शेख रफिक शेख जिलानी यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...