आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात १२ फेब्रुवारीला रात्री दानपेटीतील पैसे चोरणाऱ्या सुरक्षा रक्षक सोमनाथ हिरामण रावते (३०) याच्या विरोधात ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी कळवण पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला.
सप्तशृंगी मंदिरात १२ फेब्रुवारीला महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचा सुरक्षा रक्षक सोमनाथ रावतेने ४० व ४१ क्रमांकाच्या दानपेटींमधून काठीच्या साहाय्याने चलनी नोटा काढून घेतल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले हाेते. सुरक्षा विभागाच्या लेखी पत्रावरून विश्वस्त संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १३ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान गुप्तपणे तपास पूर्ण केला. या तपासात सुरक्षा रक्षक रावतेने सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कॅमेऱ्यांची दिशा बदलल्याचे दिसले. त्याने दानपेटीमधून पैसे चोरले तसेच दानपेटीजवळ जळालेल्या नोटा प्राप्त झाला. मात्र, दानपेटीची तोडफोड झालेली नाही. दानपेटीचे सील तसेच हाेते. तक्रारीनंतर पोलिसांनी ३७९, ४२७ प्रमाणे गुन्हा नोंद केला. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश निकम करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.