आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:सलूनच्या दुकानाआड बियाणे विक्री; शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोहन हेअर सलून दुकानातून मान्यता नसलेले बियाणे विक्री चालू असल्याची बाब निदर्शनास आली. कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोहम रामल्लू सुत्तरवार (४१), शिवाजी कवडू मांडवकर (३३) असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कायर येथील सोहन हेअर सलूनच्या दुकानातून अवैधरीत्या बियाणे विक्री सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर शनिवारी सलून दुकानात बनावट ग्राहक पाठवून मीनाक्षी बीटी कापूस बियाण्यांची पाकिटे मागण्यात आली. त्यावेळी प्रती पाकिट ८५० रूपये प्रमाणे १७०० रूपये घेऊन दोन पाकिट ग्राहकाला दिले. घरामागे चालू असलेल्या बांधकामाची पाहणी केली असता, तेथे बियाण्यांची ३० पाकिटे आढळून आली.

पाकिटामागे बियाणे आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक या भागात लागवडीस मान्यता असल्याचा उल्लेख होता. त्या ठिकाणी ३२ पाकिट किंमत अंदाजे २५९२० रूपये किंमतीचे आढळून आले. महाराष्ट्र शासनाची परवानगी नसलेले बियाणे विक्री केल्याच्या कारणाहून कृषी अधिकारी संजय वानखडे यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरोधात परवानगी नसलेले कापूस बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली. बियाणे अधिनियम १९६६ कलम १९, सहकलम बियाणे नियंत्रण आदेश १९८३ खंड ३(१) नुसार बियाणे विक्री परवाना नसतानाही विक्री करणे, अवैध ठिकाणी बियाणांचा साठा करणे अन्वये गुन्हे नोंद करण्यात आली. ही कारवाई कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, नीलेश ढाकुलकर, पंकज बरडे, संजय वानखडे अमोल कोवे, पवन पचारे आदींच्या उपस्थितीत पार पडली.

दुकानदाराने आणखी पाकिट विक्री केल्याची शक्यता
तेलंगणा येथून कापूस बियाण्यांची पाकिट आणून विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई झाली. तत्पूर्वी संबंधित हेअर सलून चालकाने बियाणे विक्री केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नेमके कुणाला किती बियाणे विक्री केली, याची चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...