आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील लिलाव झालेल्या रेतीघाटांमध्ये घाटधारकांकडुन करण्यात येत असलेल्या अनियमिततेच्या तक्रारीवरून रेती घाटांची तपासणी करण्याचा धडाका अप्पर जिल्हाधिकारी यांनी सुरू केला आहे. त्यात बुधवार दि. १ जुन रोजी त्यांनी उमरखेड तालुक्यात येत असलेल्या दोन रेतीघाटांवर अचानक धडक दिली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रेती घाट धारकांसह उमरखेड महसुल प्रशासनही पुरते हादरून गेले होते. यंदा रेती घाट लिलावामध्ये सुमारे २७ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. यापैकी काही रेतीघाटधारकांनी शासनाच्या नियमांना तीलांजली देत मनमानी पद्धतीने रेतीचा उपसा करण्यास सुरूवात केली होती. . यासंदर्भा वारंवार येणाऱ्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशावरून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांनी जिल्ह्यात विविध तालुक्यात असलेल्या रेतीघाटांवर कारवाईचा सपाटा सुरू केला. त्यात बाभुळगाव, महागांव, वणी आणि झरी तालुक्यात रेतीघाटांवर कारवाई केल्यानंतर त्यांनी बुधवारी दुपारी उमरखेड तालुक्यात असलेल्या दोन रेतीघाटांवर अचानक धडक देत तपासणी केली. त्यात हातला या रेती घाटावर त्यांनी धडक दिली असता त्या ठिकाणी रेती उपसा करुन नेत असलेला एक ट्रॅक्टर आणि घाटाशेजारी लपवुन ठेवलेली ट्रेझर बोट यासह इतर साहित्य जप्त केले. या कारवाईचा पंचनामा करुन उमरखेड तहसीलदार यांना त्यासंदर्भात माहिती देण्यात आली.या कारवाईनंतर उंचवडद या दुसऱ्या रेती घाटावर दाखल झाले. मात्र हातला रेती घाटावर झालेल्या कारवाईची माहिती त्या रेती घाटावर आधीच पोहोचल्याने रेती उपसा करणाऱ्यांनी सर्व यंत्रसामुग्रीसह पळ काढला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.