आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या मुलांना सर्वार्थाने सक्षम बनवण्यासाठी त्यांना दररोज शाळेत पाठवणे गरजेचे आहे. मुलांची बुद्धी विकसित होण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण आवश्यक असते. शाळेत दररोज घेण्यात येणारा पाठ्यक्रम त्यांचे ज्ञान वाढवतो. शाळेत विविध मैदानी खेळ खेळवले जातात. आपल्या मुलांची बौद्धिक पातळी तपासून त्यांची शिक्षण व खेळातील आवड निवड निश्चित करून त्यांची प्रगती साधता येते म्हणून पालकांनो, मुलांना दररोज शाळेत पाठवा, असे आवाहन यवतमाळ जिल्हा शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी केले.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिंचोली क्रमांक २ येथे दि. २८ जानेवारीला विद्यार्थ्यांचा शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, सरपंच हरीश मनवर, माजी सरपंच मीनाक्षी देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय खंडारे, हरसुल केंद्राचे केंद्रप्रमुख हेमंत दळवी, अंगणवाडी सुपरवायझर सुनंदा वाघ, माजी केंद्रप्रमुख महानंदा गरबळे, आयटक संघटनेच्या रचना जाधव, रमा गजभार, शाळेचे माजी मुख्याध्यापक राजू ढोले, दुर्गादास गायकवाड, वानखडे, सुनील कांबळे, रमेश गावंडे, सतीश जयस्वाल, सुनील नाटकर, मोतीराम खेकाळे, अंगणवाडी सेविका इंदू इंगोले, कांता जयस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. आदर्श शाळा चिंचोली येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर उत्कृष्ट खेळून चॅम्पियन ट्रॉफी जिंकून आणून जिल्हास्तरावर निवड झाल्याने मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य , नाटके सादर करून नागरिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली दातीर, सोनाली चिकणे यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक हिराकांत बोबडे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक हिराकांत बोबडे, श्रीमती इंदु अडपवार, नितीन डहाके, सोनाली चिकणे, वैशाली दातीर, संध्या तायडे यांनी अथक परिश्रमातून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.