आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कारच्या धडकेत बकरी चारणारा युवक गंभीर; जखमी युवक खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल

पुसद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद ते माहुर रोड लगतच्या आजूबाजूच्या शेतातून बकऱ्यांना चारा आणण्यासाठी पायदळ जात असलेल्या युवकाला दि. ३ एप्रिलला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविणाऱ्या वाहनाने उडविले. वाहनाने धडक दिल्याने युवकाच्या डोक्याला,छातीला गंभीर दुखापत झाली असून त्या युवकावर येथील दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहे. रिजवान खान अस्लम खान वय ३४ वर्ष रा. इंदिरानगर असे तक्रारदार युवकाचे नाव आहे. तर भूषण विजय पत्रे असे गुन्हे दाखल झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, रिजवान खानचा चुलत भाऊ इरशाद खान शरल खान अधुन मधुन बकरीचा चारा आणण्यासाठी पुसद ते माहुर रोड लगतच्या आजु बाजुच्या शेतात जात होता. नेहमी प्रमाणे इरशाद खान बकरीचा चारा आणण्यासाठी आजु बाजुच्या शेतात दि. ३ एप्रिलला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान इंदिरानगर येथून माहुर रोड वरुन जवळच्या शेतात जात असताना इरफान भाई पंचरवाले यांचा दुकाना समोरुन जात असतांना माहुरकडुन पुसदकडे भरधाव वेगाने एमएच-२९-एआर-१५३५ क्रमांकाच्या फोर व्हीलरच्या चालकाने इरशाद खानला जोरदार धडक मारली. या धडकेत इरशाद खान हा रोडच्या बाजुला असलेल्या नालीत जावुन पडला. फोरव्हीलर वाहन सुध्दा रोडच्या बाजुला नालीत पलटी झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाव घेवून जखमीला नालीच्या बाहेर काढले.‌ वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन अपघात केला. जखमीला अस्लम, जावेद खान यांचे मदतीने ऑटोने खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती केले आहे.

बातम्या आणखी आहेत...