आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय लोक न्यायालय:लोकन्यायालयात बत्तीस प्रकरणाचा निपटारा

मारेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राष्ट्रीय लोक न्यायालयात बत्तीस प्रकरणाचा निपटारा तडजोडीतून ९ लाख ९९ हजार ७६३ रुपये रिकव्हरी व दंड वसूल करण्यात आली. या लोकन्यायालयाचे पॅनल प्रमुख न्यायधीश नीलेश वासाडे, पॅनल मेंबर अॅड. हुसेनी, ज्योतिबा पोटे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत होते.या लोक न्यायालयात तरजोडकरुन साधारणतः दहा लाख रुपयाची वसुली विविध केसेस मधुन करण्यात आली.

त्या आठ केस चेक बाउन्ससह केसेस मोटर व्हेइकल संदर्भात, सतरा केसेस विविध गुन्ह्याच्या तर एक केस घटस्फोट प्रकरणाची निकाली काढली. यामध्ये पॅनल प्रमुख न्यायाधीश नीलेश वासाडे, पॅनल मेंबर अॅड हुसेनी, ज्योतिबा पोटे, मारेगाव पोलिस ठाण्यातील उपनिरिक्षक ज्ञानेश्वर सावंत पॅनल बोर्डवर होते. लोक अदालतचे कामकाज वरिष्ठ कारकून पुंड, डोईजड, कोर्ट पियुन अजमेरकर, राऊत, कोर्ट कर्मचारी सूरज टेम्बरे, पांडुरंग वासाड, बुजाडे, शेबे, कऱ्हाड, पिल्लारे यांनी पाहिले.

बातम्या आणखी आहेत...