आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडपाण्याचा गंभीर प्रश्न:लोहारा परिसरात सांडपाण्याची समस्या

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेच्या लोहारा उपविभाग कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिसरातील काही भागात सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्यामुळे ही समस्या तीव्र झाली आहे. नागरिकांनी पाण्याचा निचरा व्हावा यासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती केली आहे.

मात्र, कालांतराने ते निरुपयोगी ठरत आहे. . या पाण्याची दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कच्च्या नाल्या स्वच्छ केल्या जात असल्या तरी काही दिवसाने जैसे थे परिस्थिती होते.

बातम्या आणखी आहेत...