आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतीशताब्दी वर्ष:कृतिशील राजा अन् सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष म्हणजे शाहू महाराज; विद्यानिकेतन शाळेत डॉ. संजय बंग यांचे प्रतिपादन

दिग्रस10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण क्षेत्रात बहुजन समाज बोटावर मोजता येईल इतकाच होता. पाणी, रस्ते, शेती, व्यापार, कला अविकसित होत्या, म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग या रंजल्या- गांजलेल्या लोकांसाठी केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून शाळा महाविद्यालये व बोर्डिंग, शिष्यवृत्त्या सुरू केल्या म्हणूनच राजर्षी शाहू महाराज हे एक कृतिशील राजे, समाजसुधारक व सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष होते, असे मत राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ संजय बंग यांनी व्यक्त केले.

सर्व प्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. नंतर प्रास्ताविकपर भाषणात शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. तसेच शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वाला कृतज्ञता म्हणून म्हणून १०० सेकंद स्तब्ध राहून आदरांजली दिली.

बंग पुढे बोलतांना म्हणाले बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय हे ओळखून बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य करणारे तसेच ज्यांनी आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि अस्पृश्‍य- बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. भारतीय समाजात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते.

शिवाय समाज हा जातीपातींनी दुभंगलेला व जातीय वादाने फार पोखरलेला होता याची जाणीव शाहू महाराजांना होती.शेकडो वर्षे अस्पृश्‍य समाज, बहुजन समाज ज्ञान, सत्ता, संपत्ती, शिक्षण अशा अनेक गोष्टींपासून वंचित राहिला होता. कार्यक्रमासाठी शाळेचे पदाधिकारी नितीन राऊत, विलास राऊत व तसेच शिक्षक अमित वानखडे, श्रीनिवास देशपांडे, निखिल निमकर, अमोल वानखेडे, गणेश आंदुले, विकास कोटरवार, आनंद बोरकर, पारस वारकरी, चंद्रकांत पोरे, मंगल जाधव, युवराज मोहेकर, किरण हिंगमिरे, पवन इंगोले, अशोक मोरेकर, आनंद बोरकर, दीपक काराणी, राजेश तळोकर यांनी परिश्रम घेतले तर हेमंत डूबे यांनी आभार प्रदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...