आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशिक्षित शिकलकरी समाजावर होत असलेला शासकीय दुजाभाव व अन्याय दुर करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी शिकलकरी शीख यांनी आक्रमक होत संघटनेच्या वतीने नागपूर विधानभवनावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन विविध समस्यांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. , शिकलकरी शीख समाज महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ३४० तालुक्यात वास्तव्यास आहे. परंतु हा समाज अशिक्षित असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. हा समाज शासकीय सुविधा योजनांपासून आजपर्यंत वंचित राहिला आहे.
भटके विमुक्त जाती-जमातीतील नागरिक असतानाही त्यांना शासकीय योजना व सुविधांचा लाभ मिळत नाही. मागील साडेचारशे वर्षांपासून भारत देशांतर्गत होणाऱ्या स्वातंत्र्य पूर्व काळात स्वातंत्र्य संग्रामात मानवी हक्कांसाठी झालेल्या युद्धांमध्ये अनेक शूरवीर योद्ध्यांना शिकलकरी समाजाने विशिष्ट शस्त्रसाठा तलवार, तीर, कमान, भाले आदी प्रकारांच्या शस्त्रांचा पुरवठा केला होता.
क्रांतिकारी भारत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात ऐतिहासिक योगदान सोनेरी अक्षराने नमुद आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात ११ ते १२ लाख लोकसंख्येत असलेल्या शिकलकरी शीख समाज अशिक्षीत असल्याने भटकलेल्या परिस्थितीत अत्यंत गरीब अवस्थेमध्ये जीवन जगत आहे. त्यामुळे या समाजातील युवकांना विशिष्ट आरक्षण अंतर्गत शासकीय नोकऱ्या देण्यात याव्यात, समाजाच्या विविध समस्या सोडवण्यात याव्यात, गुरूद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड येथील गुरूद्वारा निवडणुकीत या समाजातील एका सदस्याची गुरुद्वारा बोर्ड मध्ये अशासकीय सदस्यपदी निवड करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शिकलकरी समाज बांधव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.