आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम:यवतमाळमध्ये तिथीनुसार‎ शिवजयंती उत्साहात साजरी‎

यवतमाळ‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी‎ महाराज यांच्या ३९३ जयंतीनिमित्त शिवाजी चौक‎ माळीपुरा येथे विविध कार्यक्रम आयोजित केले‎ होते. तीन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सूरज‎ गुप्ता यांच्या अध्यक्षतेत शिवजयंती उत्सव‎ समिती व श्री शिवाजी मंडळ माळीपुरा यांच्या‎ पुढाकाराने उत्साहात शिवजयंती साजरी‎ करण्यात आली.‎ शुक्रवारी सकाळी शिवजन्म पाळणा हा‎ कार्यक्रम अर्चना काळे व संच यांनी सादर केला.‎ नंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. शेकडो‎ युवकांच्या सहभागाने जय भवानी, जय शिवाजी‎ अशा जयघोषाने यवतमाळ शहर शिवमय झाले‎ ओते.

श्री औदार्य महाराज यांनी शिवजयंती‎ उत्सव समितीचे अध्यक्ष सूरज अनिलकुमार‎ गुप्ता यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे‎ पूजन करून घेतले. या वेळी अजय मुंधडा,‎ चंद्रकांत गद्दमवार, विजय राय, राजू पडगीलवार,‎ राजेंद्र गायकवाड, नाना हर्षे, अनंत पांडे, अशोक‎ जिरकर, आभा राठोड, जाधव उपस्थित होते.‎ यावेळी दुचाकी रॅली प्रमुख अजिंक्य शिंदे, गौरव‎ मानेकर, भारत गड्डमवार, स्वप्निल उलांगवार,‎ सौरभ कुंभारखाने, कार्तिक चचाने, जय चौधरी,‎ नयन गुप्ता, साहिल मिश्रा, आदिनाथ राखे,‎ अभिषेक जाधव, आशिष तिवारी, चिन्मय‎ बाळापुरे, राघवेंद्र वेदाम्पद्दी, अमोल हांडे, राज‎ पिंपलशेंडे, सुमित झोपटे, वेदांग नागोसे, आशू‎ वाघ यांनी दुचाकी रॅली यशस्वी करण्यासाठी‎ परिश्रम घेतले. समिती अध्यक्ष सूरज गुप्ता,‎ उपाध्यक्ष भारत गड्डमवार, दिनेश निनावे, रोशन‎ भुजाडे, आशिष चौधरी, गौरव मानेकर, महेश‎ वाघ, तुषार धोटे, पीयुष जिरकर, रवींद्र तोंडरे‎ यांच्या मार्गदर्शनात शेकडो युवक, माता-भगिनी‎ च्या सहभागाने कार्यक्रम घेण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...