आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर यवतमाळ मध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील दत्त चौक येथे सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर राज्यभरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यवतमाळ मध्ये देखील शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी विरोधात, केद्रं सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे म्हणाले की, ईडी सारख्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही कारवाई सूडबुद्धीने केली जात आहे. राजेंद्र गायकवाड यांनी केंद्र सरकारचा समाचार घेत संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईची निषेध नोंदवला.. विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा ह्यांच्यावर तिखट शब्दात एकच हल्ला चढवला. भाजप जर अजूनही ताळ्यावर येत नसेल तर मला मानवी बॉम्ब बनावे लागेल असे म्हणून त्यांनी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडवून दिली.
ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा, तालुका युवा अधिकारी पवन शेंद्रे, व्यापारी आघाडी जिल्हा संघटक प्रवीण निमोदीया, शेतकरी सेनेचे अशोक पुरी, शहर प्रमुख नीलेश बेलोकर, शहर प्रमुख योगेश भांदक्कर, शहर प्रमुख अतुल गुल्हाने, शहर संघटक चेतन शिरसाठ, शहर समन्वयक तुषार देशमुख, जिल्हा संघटिका निर्मला विनकरे, शहर संघटिका कल्पना दरवाई, युवा सेना जिल्हा समन्वयक अमोल धोपेकर, युवसेना उपजिल्हा युवा अधिकारी गिरीजानंद कळंबे, व्यापारी आघाडी उपजिल्हा प्रमुख सुजित मुनगिनवार, उपतालुका प्रमुख चंद्रकांत उडाखे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रूपेश सावरकर, युवासेना जिल्हा चिटणीस श्रीकांत मीरासे, आदिवासी आघाडी प्रमुख वसंत कंगाले, गार्गी गिरडकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.