आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा प्रमुख:शिवसेना जिल्हा प्रमुखपदी प्रवीण शिंदे

यवतमाळ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त पदावर आर्णीतील प्रवीण शिंदे यांची वर्णी लागली आहे. दोन जिल्हा प्रमुखांकडची जबाबदारीही बदलण्यात आली आहे.

यवतमाळ, दिग्रस आणि उमरखेड या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर राजेंद्र गायकवाड यांच्याकडे असलेल्या आर्णी आणि पुसद विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागलेल्या शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तिसरे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्याकडे वणी आणि केळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी कायम आहे.

काही पदाधिकाऱ्यांचीही नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात संतोष ढवळे यांना संपर्कप्रमुख, योगीता मोहोड, कल्पणा दरवई महिला जिल्हा संघटक, अतुल गुल्हाणे शहर प्रमुख यवतमाळ, गजानन पांडे तालुका प्रमुख बाभुळगाव, रवी पांडे तालुका प्रमुख पुसद, तुषार देशमुख शहर संघटक यवतमाळ, अमोल दुधे शहर प्रमुख दारव्हा, रवी काळे शहर प्रमुख बाभुळगाव यांची नियुक्ती केली आहे.

संजय राठोड यांच्या बंडापूर्वीपर्यंत त्यांचे खंदे समर्थक असलेले पराग पिंगळे बंडानंतर शिवसेनेत कायम होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी संजय राठोड यांनी अचानक पराग पिंगळे यांच्या घरी भेट दिली. यावेळी दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाली. ही भेट सहज असल्याचे पराग पिंगळे यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी संजय राठोड यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.