आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखपदी राजेंद्र गायकवाड

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्याकरिता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख पदी राजेंद्र गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक पदी श्रीकांत मुनगीनवार, जिल्हाप्रमुख पदी प्रवीण शिंदे (दिग्रस, आर्णी, उमरखेड), विश्वास नांदेकर (वणी, राळेगाव), संतोष ढवळे (यवतमाळ, पुसद), उपजिल्हाप्रमुख पदी रवी ऊर्फ श्रीकांत राठोड (आर्णी विधानसभा), प्रसिद्धीप्रमुख पदी प्रशिल ढोके (आर्णी विधानसभा), तालुकाप्रमुख पदी उज्ज्वल मोरे (आर्णी तालुका), तालुका संघटक पदी धनराज राठोड (आर्णी तालुका), शहरप्रमुख पदी गजेंद्र ठाकरे (उमरखेड शहर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...