आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:शिवसेना नेते संदिपान भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पद रिक्त होते

यवतमाळ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
संदिपान भुमरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- फाईल फोटो - Divya Marathi
संदिपान भुमरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- फाईल फोटो
  • संदिपान भुमरे यांच्याकडे राज्याच्या रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रीपदाची जबाबदारी आहे

शिवसेना नेते आणि राज्याचे रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. आजच राज्य सरकारने त्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त केले. संदिपान भुमरे औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्याचे आमदार आहेत.

यापूर्वी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे होते. पण, संजय राठोड यांचे पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री नव्हता. आज अखेर राज्य सरकारने संदिपान भूमरे यांच्या रुपाने जिल्ह्याला नवा पालकमंत्री दिला.

कोण आहेत संदिपान भुमरे?

संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. सध्या ते महाविकास आघाडी सरकारमध्ये फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.

बातम्या आणखी आहेत...