आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर परिषदांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असून आमदार संजय राठोड, माजीमंत्री संजय देशमुख, सदफजहा मो. जावेद पहेलवान व जावेद पहेलवान या राजकीय दिग्गजांकडून चुरशीचा संघर्ष सुरु झाला आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले होते. यंदाही आपणच निवडून येऊ, या धारणेतून शिवसेनेचे हवसे नवसे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मागील पाच वर्ष वगळता संजय देशमुख समर्थित परिवर्तन विकास आघाडीची दिग्रस नगर पालिकेवर एकहाती सत्ता होती. दिग्रस तालुक्यातील बहुतांश गावातील सोसायटीच्या निवडणुकीत देशमुखांनी परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
साम व दामचा उपयोग करुन दिग्रस नगर परिषदेवर पुन्हा सत्ता स्थापन करु, असा विश्वास देशमुख व त्यांच्या परिवर्तन विकास आघाडीला आहे. तर जावेद पहेलवान हे येथील पालिका राजकीय क्षेत्रातील एक परिचित अपक्ष व्यक्तीमत्व आहे असून नगर परिषद निवडणूक हे एकमेव उद्देश पहेलवान यांचा आहे.
आपल्याच परिवारातील ४ उमेदवार निवडून आणण्यात ते यशस्वी झाले. विशेष म्हणजे त्यांची पत्नी सदफजहाँ जावेद पाच वर्षांपासून नगराध्यक्ष असल्याने सत्तेची आस पहेलवान घेऊन बसले आहे. एकंदरीत शिवसेना, परिवर्तन विकास आघाडी व अपक्ष यांच्यात निवडणूक सामना रंगणार असून, आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु आहे. यामध्ये कोणाला यश मिळेल, याकडे सर्वांचे लागून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.