आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव रूद्राभिषेक:महर्षि विद्या मंदिरमध्ये शिव रूद्राभिषेक

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍थानिक बोरगांव रस्त्यावर असलेल्या महर्षि विद्या मंदिर, मोहा येथे सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी हरीयाली तिज व श्रावण मास निमित्‍त भगवान “शिव रूद्राभिषेक” मोठ्या उत्‍साहात व भक्‍तिभावाने साजरा करण्यात आला.सर्वप्रथम सकाळी शिवलिंगावर वैदिक मत्रोच्‍चाराद्वारे प्राचार्य एस. एन. तिवारी यांच्‍या निर्देशनात साजरा झाला. तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका हरीयाली तिज प्रसंगी हरित वर्ण वस्‍त्रालंकार धारण करून आराध्यदैवत भगवान शिवपार्वती पूजन केले.

या प्रसंगी विद्यार्थिनींनी मोहक नृत्‍याचे व गायनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच हरीयाली तिज या पावन प्रसंगी विद्यार्थी शिक्षक शिक्षिकांनी शाळेच्‍या प्रांगणात वृक्षारोपण केले. व पर्यावरणामध्ये वृक्षाचे काय महत्‍व आहे हे आपल्‍या कृतीने पटवून दिले.

बातम्या आणखी आहेत...