आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार सोमवार, दि. ६ जुन रोजी सावरगड ग्राम पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सरपंच इंदिरा दोनोड यांच्या हस्ते गुढी उभारून शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे. त्यामुळे दि. ६ जून १६७४ त्या दिवशी शिवरायांना ‘शिवछत्रपती’ होण्याचा सन्मान प्राप्त झाला आणि पुढे महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले. आणि बुद्धी, शौर्य, धडाडी, निष्ठा आणि धैर्य या जोरावर महाराजांनी शत्रूंना पराभूत करुन भारतभूमीवर आपली पकड मजबूत केली. या कार्यात महाराजांना मावळ्यांची अखंड साथ आणि जनतेचे अमुल्य प्रेम मिळाले. व आजही महाराजांचे स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अबाधित असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार सावरगड ग्राम पंचायत कार्यालयातील प्रांगणात शिवराज्याभिषेक गुढी उभारण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला उपसरपंच शंकर भुजाडे, सचिव रेखा मडावी, ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिव रेखा मडावी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.