आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन‎:दिग्रस येथे "शिवतेज‎ किल्लोत्सवाचे आयोजन‎

दिग्रस‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र ओळखला जातो तो‎ छत्रपती शिवरायांमुळे, त्यांच्या ‎ ‎ अतुलनीय पराक्रमामुळे अन् या ‎ ‎ पराक्रमाचे साक्षीदार आहेत ते ‎ ‎ महाराष्ट्रातील गड व किल्ले..! ‎ महाराजांच्या पराक्रमाला साथ‎ मिळाली ती गडकोट किल्ल्यांची,‎ शिवरायांच्या या गड कोट‎ किल्ल्यांची व महाराजांच्या‎ पराक्रमाची परंपरा जोपासली आहे‎ ती शिवतेज किल्लोत्सवाचे‎ माध्यमातून शिवतेज संस्थेने..!‎ गेल्या सोळा वर्षांपासून या किल्ले‎ बनवा स्पर्धेचे आयोजन जिल्हाभर‎ केले जाते. यंदा जिल्ह्यातील सर्वच‎ जि. प. शाळांमधून या स्पर्धेचे केंद्र‎ स्तरावर आयोजन केले आहे.‎ प्रत्येक शाळेतील तथा विद्यार्थ्यांनी‎ तयार केलेल्या किल्ल्यांचे परीक्षण‎ स्थानिक मुख्याध्यापक व शिक्षक‎ करतील. त्यानंतर केंद्र प्रमुख‎ आपल्या केंद्रातून प्रथम तीन क्रमांक‎ निवडतील. हे परीक्षण बाल दिनी १४‎ नोव्हेंबर रोजी पूर्ण होईल.‎

दरवर्षी दिवाळीच्या सुट्यांमध्ये‎ या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन‎ केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी‎ खुली व नि:शुल्क आहे. कुणीही या‎ स्पर्धेत वैयक्तिक किंवा सामुहिक‎ भाग घेऊ शकतो. आपल्या घरी,‎ अंगणात, छतावर, मैदानात, शाळेत‎ कोठेही किल्ला बनविण्याचे‎ स्वातंत्र्य देण्यात आले आहे. दगड,‎ माती, विटा, सिमेंट यांचा वापर‎ करून तयार केलेली, पर्यावरण‎ पुरक व नोंदणीकृत किल्लेच स्पर्धेत‎ विचारात घेतली जातात.‎

महाराष्ट्रातील सर्वच शाळा किल्ला‎ युक्त व्हाव्यात हा शिवतेजचा‎ संकल्प आहे. शिवरायांचा‎ दैदिप्यमान इतिहासचा व पराक्रमाचा‎ सार्थ अभिमान, शिवरायांच्या या‎ पावनभूमीत राहणाऱ्या प्रत्येकाला‎ असावा. तो अभिमान पुढच्या‎ पिढीला व्हावा, असे कार्य शिवतेज‎ संस्था गेली पंधरा वर्षांपासुन करीत‎ आहे. शहरी विभाग व ग्रामीण‎ विभाग अशा दोन विभागात ही स्पर्धा‎ घेतली जाते. सहभाग घेणाऱ्या‎ प्रत्येक स्पर्धकाला स्मृती चिन्ह व‎ प्रमाणपत्र बक्षीस वितरण‎ कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दिले‎ जाते. स्पर्धेचे परीक्षण मान्यवर‎ करीत असतात.‎

बातम्या आणखी आहेत...