आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटवडा:जिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरजू रुग्णांना आर्थिक झळ; औषधे खरेदी करावी लागत असल्यामुळे त्रस्त

जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार कमी पैशात होत असल्याने जिल्ह्यातील गरजू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर डॉक्टर संबंधीत रुग्णांना काही औषधी लिहून देतात. मात्र दहा औषधी पैकी दोन ते तिनच औषधी रुग्णालयात उपलब्ध असते. त्यामूळे उर्वरीत औषधी बाहेरून किंवा खाजगी औषध केंद्रातून घेण्याचा सल्ला रुग्णांना दिला जातो. यामूळे रुग्णांचे हाल होतांना दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यापासून शहरातील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून त्यांना आर्थिक झळ बसत आहे. उन्हाळ्याच्या वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागात साथरोगांचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी गर्दी असते. यात सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण आहे. रुग्णालयातील रुग्णांना डॉक्टर प्रकृती सुधारण्यासाठी औषधे देतात, मात्र रुग्णालयातील औषध वाटप विभागात औषधांचा साठा बऱ्याच प्रमाणात संपला असल्याने गरीब रुग्णांना स्वत: औषधे खरेदी करावी लागत आहेत.

रुग्णालय परिसर वाऱ्यावर
ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे अन् रंगलेल्या भिंतीमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचाच विपरीत परिणाम रुग्णांवर पडत आहे, परंतू रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना सुद्धा उपचार घेण्याची वेळ आली आहे. कधीकाळी स्वच्छतेवर विशेष लक्ष देणाऱ्या रुग्णालय परिसर वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने यावर लक्ष देत रूग्णालयासह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची काळजी घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

बातम्या आणखी आहेत...