आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधावंडा नदीच्या काठावर स्थित असलेले श्री पाळेश्वर महादेव भाविकांचे श्रद्धास्थान आहे.या मंदिरात २९ जुलै ते २७ ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाने श्रावण मास उत्सव साजरा होत आहे.या श्रावण मास उत्सवा दरम्यान दर श्रावण सोमवारी सायंकाळी ६.३० ते ७ .३० वाजे पर्यंत सत्य साई सेवा समिती तर्फे भजन रात्री ८.३० वाजता श्री आप्पास्वामी भजनी मंडळाच्या संचलनाने महाआरती संपन्न होणार आहे. गुरुवार ता. ४ ऑगस्टला तुलसीदास जयंती निमित्त श्री छत्रपती रामायण मंडळाचे अखंड रामायण व शुक्रवार ता. ५ ऑगस्टला आरती व प्रसादानंतर अखंड रामायणाची सांगता होईल सोमवार ता. ८ ऑगस्ट ते रविवार ता. १४ ऑगस्ट पर्यंत सप्ताहाभर दररोज सकाळी ७.३० ते सकाळी १०.३० वाजे पर्यंत शिवलीला मृत ग्रंथाचे सामूहिक पारायण हभप माहुरे महाराजांच्या व्यासपीठ द्वारे आयोजित करण्यात आले आहे. पारायणाचे यजमान सीमा व गजानन राजेश्वर पद्मावार हे असून पारायणास बसणाऱ्या भाविकांनी आपली नावे मंदिरात नोंदवावी. यासह २७ ऑगस्ट ला सकाळी १० वाजता श्री पाळेश्वर महादेवाची महाआरती व प्रसाद वितरणाने श्रावणमास उत्सवाची सांगता होणार आहे. श्रावणमास उत्सव निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पाळेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त मंडळाने केले आहे.
श्री पालेश्वर मंदिरातील शिवलिंग पूर्व पश्चिम
शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या धावंडा नदीच्या काठावरील हे मंदिर अत्यंत प्राचीन असून इतर शिवालयापेक्षा वेगळे आहे. साधारणपणे शिवालयातील शिवलिंग दक्षिणोत्तर असतात. परंतु श्री पालेश्वर मंदिरातील शिवलिंग पूर्व पश्चिम आहे. संस्थांच्या वतीने दरवर्षी श्रावण मास निमित्त व शिवरात्री निमित्त आणि इतर प्रसंगी दरवर्षी विशेष आयोजन केले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.