आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसगत टाळण्यासाठी साक्षर व्हा:चतूर व्यापारी स्वत:च्या फायद्यासाठी अनेक अशिक्षितांचा घेतात गैरफायदा

पुसद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताला खेडेगावांचा देश म्हटले जाते. कारण आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे खेडेगावातच राहतात. या लोकांमध्ये शेतकरी, मजूरांची संख्या अधिक आहे . ते सर्वात जास्त अशिक्षित व निरीक्षक हेच खेडेगावातील लोक आहेत. अशा काळात त्यांच्या अशिक्षिततेचा फायदा घेऊन अनेक चतुर व्यापारी, इतर व्यक्ती आपल्या स्वतःच्या लाभासाठी फायदा करून घेतात, असे मत न्यायाधीश व्ही.बि.कुलकर्णी यांनी केले.

कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस तसेच मानसिक आजारी, मानसिक दृष्ट्या अक्षम व्यक्तीसाठी जनजागृती ज्ञानदान कार्यक्रमाचे तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्ही. बी. कुलकर्णी, प्रभारी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तसेच एस.एन.नाईक, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाघमोडे यांनी न्यायालयातील पक्षकारांवरील विषयासंबंधातून कायदेविषयक ज्ञानदान केले.

पूढे बोलताना ते म्हणाले की, साक्षरता म्हणजे केवळ वाचन येणे असे नसून लिहिता वाचता येवून माणसाची शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, भौतिक उन्नती होणे, असे अभिप्रेत आहे. त्याप्रमाणे भारत हा प्रयत्नशील आहे. साक्षरतेचा संबंध देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाशी आहे. शिक्षणाशिवाय तिचे जीवन अपुरे आहे. ते पशू प्रमाणे होते. तसेच त्यांनी संपूर्ण जगभरात दि.८ सप्टेंबर रोजी विधी साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांनी साक्षर होऊन स्वतःचा आणि पर्यायाने कुटुंबाचा विकास करावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे सांगितले. साक्षरतेचे महत्व सर्व जगाला पटवून देणे ही काळाची गरज आहे. जीवन सुखकर बनविले जाते. शासनाच्या योजना समजताच बरोबर विकास साधता येतो. लोकांचे राहणीमान उंचावेल तसेच वैचारिक दृष्टिकोन उंचावत जातो. आपल्या देशातील ८४.७ टक्के लोक साक्षर आहेत. तेंव्हा त्यांनी इतरांना साक्षर करण्याची जबाबदारी पार पाडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन व्ही. बी. कुळकर्णी यांनी केले. सासु सुनेने वाद टाळावे योग्य हेच औषध आहे. आपण दुसऱ्यांना तुच्छ लेखणे बंद करावे, गंभीर परिस्थिती झाल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी, असे मुलाचे मार्गदर्शन कुलकर्णी यांनी केले. न्यायाधीश वाघमोडे आणि नाईक यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. मनोज घाडगे, संजय राठोड, संचालन वकील संघाचे सचिव संजय राठोड, तर ॲड. सुशीला नरवाडे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...