आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा तालुक्यातील विडुळ येथील श्री उमामहेश्वर संस्थान येथून बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त निघालेल्या श्री उमामहेश्वर मन्मथ ज्योत यात्रेचे उमरखेड येथे स्वागत केले. वीरशैव संत परंपरेतील १६ व्या शतकातील संत श्री मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधी स्थळी श्री क्षेत्र कपिलधार जिल्हा बीड येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यातून अनेक शिवाचार्यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या दिंडींच्या माध्यमातून लाखो भाविक सहभागी होतात.
यावेळी सलग सहाव्या वर्षी विडूळ येथून ज्योत यात्रा निघाली असून, उमरखेड येथे आगमन होताच ढाणकी रोडवर ज्योत यात्रेचे उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार आनंद देऊळगावकर, माजी नगर पालिका शिक्षण सभापती प्रकाशअप्पा दूधेवार, सागर बारे, प्रभाकर दिघेवार, गजानन रासकर, अशोक आप्पा पुरमे, संतोष आप्पा हिंगमिरे, शैलेश दिघेवार, बबनअप्पा भोकरे, किसन हिंगमीरे, सावन हिंगमिरे, किसन आप्पा बिचेवार, जयशंकर जवणे, डॉ. महेश बट्टेवार, शिवहार दुधेवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महात्मा बसवेश्वर महिला भजनी मंडळाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.
श्री उमामहेश्वर मन्मथ ज्योत यात्रेच्या यशस्वितेसाठी वसंता मुलंगे, रामेश्वर बिचेवार, निलेश बोनसले, गजानन मुलंगे, राजेश बोंन्तले, प्रमोद दिल्लेवार, बंटी गांजरे, निरंजन बोईनवाड, शिवा आलमे, सौरभ आलमे, गोविंद बोन्सले, अविनाश बिचेवार, कृष्णा गाजेवार, ईश्वर गांजरे, शिवम आलमे, अक्षय बोन्सले, सार्थक बोंन्सले, वेदांत गांजरे, गणेश कनकापुरे, आकाश कनकापुरे, शिवाजी कंठाळे, शिवाजी राजेवाड, शिवानंद खंदारे, शिवप्रसाद खंदारे, रामदास घोडेकर, सुमित बोन्सले, प्रीतम बिचेवार, सुदर्शन रणमले, सागर मुलंगे, भगवान काचर्डे, सतीश वाकडे, वैभव सुकळे, कैलास बोन्तले, कल्याण मुलंगे, गजानन कोतेवार, वेदांत गांजरे, सिद्धांत गांजरे, मयूर मुलंगे, गजानन बिचेवार, महेश्वर बिचेवार, निखिल पिंपळे, सिद्धेश्वर करकले, सुनील मुलंगे, दिलीप दळवी, कैलास दुर्केवार, शिवानंद बिचेवार, आनंदराव कनकापुरे आदी विडूळ येथील मन्मथ भक्त यात्रेच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.