आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन शिरपूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विश्वकर्मा संस्थान मूळ देवस्थान येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री विश्वकर्मा संस्थान मूळ देवस्थान शिरपूर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री चा महोत्सव विश्वकर्मीय बांधवाकडून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ता १ रोजी सकाळी धर्म ध्वजारोहण जनार्दन पंत उद्धवराव रत्नपारखी अध्यक्ष विश्वकर्मा संस्थान शिरपूर व श्रीकांत अरुणराव साखरकर अध्यक्ष विश्वकर्मा जयंती उत्सव समिती यांचे शुभ हस्ते पार पडले.तसेच श्री विश्वकर्मा प्रभू व संत पदमाजी महाराजांचा अभिषेक व पूजा करण्यात आली,ता २ रोजी सकाळी पिवळे वस्त्र परिधान करून गावातून कलश यात्रा काढण्यात आली, त्यानंतर गायत्री महायज्ञ,श्री विश्वकर्मा यज्ञ सुरू झाला, यावेळी यज्ञ पुरोहित म्हणून पुरुषोत्तम जी दुरतकर व गायत्री परिवार वाशिम हे होते,तर ता ३ रोजी सकाळी गायत्री यज्ञ हवन व पूर्णाहुती त्या नंतर श्री विश्वकर्मा प्रभूची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली यावेळी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
त्यानंतर समाज मेळावा घेण्यात आला यावेळी मंचावर विश्वस्त रमेशपंत केजकर, रामदास पंत काटकर, श्रीकांत साखरकर, पुरुषोत्तम दुरतकर, विनोद मुगावानकर, संजय हांडेकर मूर्तिकार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर यज्ञासाठी बसलेल्या सर्व यजमानांचे शाल, टोपी, साडी देऊन सपत्नीक स्वागत करण्यात आले,
मंदिरचे पुजारी तथा विश्वकर्मा पुराण वाचक गजानन मुगावानकर यांचे स्वागत, मूर्तिकार संजय हांडेकर,गायत्री परिवार वाशिम चे पुरुषोत्तम दुरतकर,शुभम गहुले आदी मान्यवरांचे शाल, पुष्पहार, साडी आदी देऊन सत्कार करण्यात आला.या समाज मेळाव्यात मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले, तर श्री विश्वकर्मा मंदिराचे बांधकाम करण्यासाठी संकल्प करण्यात आला, या कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक उमेश गिरडे यांनी केले तर आभार किशोर मुगावानकर यांनी मानले त्यानंतर भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला.
श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवा दरम्यान राज्यभरातील विविध ठिकाणावरून विश्वकर्मीय भाविक उपस्थित झाले होते.कोरोना काळानंतर प्रथमच श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव मोठया प्रमाणात साजरा झाला,त्यामुळे भाविकांत मोठा उत्साह दिसून आला. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन अध्यक्ष व विश्वस्त समिती श्री विश्वकर्मा संस्थान शिरपूर व श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव समिती यांच्याकडून उत्तम करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.